top of page
Writer's pictureMahannewsonline

धक्कादायक! वृद्धाश्रमातील ६७ जणांना एकाच वेळी कोरोनाची लागण

वृद्धाश्रमातील ६७ वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या खडवली येथील वृद्धाश्रमात १०० हून अधिक वृद्ध राहत आहेत. या वृद्धाश्रमातील एका वृद्धाला ताप आला होता, तो कमी न झाल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने वृद्धाश्रमातील इतरांचीही चाचणी करण्यात आली असता तब्बल ६७ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

सर्वांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यामध्ये एका लहान मुलासह ३९ पुरुष तर एका लहान मुलीसह २८ महिलांचा समावेश आहे.


bottom of page