top of page
Writer's pictureMahannewsonline

दहशतवादी समजून नागरिकांवर गोळीबार; १३ जणांचा मृत्यू

दहशतवादी समजून सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागालँडमध्ये घडली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्याचंही समोर आलंय. शनिवारी (४ डिसेंबर) संध्याकाळी मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात ही घटना घडली,

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मजूर असून ते पिकअप ट्रकमधून काम करून घरी परतत होते. त्यावेळी सुरक्षा दलांनी त्यांना दहशतवादी समजून त्यांच्यावर गोळीबार केला. गावकरी वेळेवर घरी न पोहोचल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याचवेळी ग्रामस्थांनी कामगारांचे मृतदेह पाहिल्यानंतर संतप्त होऊन त्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या. या घटनेनंतर नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'नागालँडच्या ओटिंगमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेची कसून चौकशी करेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.





bottom of page