top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोनानं एकाच दिवसात ५० डॉक्टरांचा मृत्यू

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातले असून आरोग्यसेवेवर त्याचा ताण पडत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वसामान्यांसोबतच डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७३६ डॉक्टरांना तर दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रविवारी एकाच दिवशी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु, आतापर्यंत केवळ ६६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. डॉक्टरांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितलं आहे.


डॉक्टरांची संख्या कमी असून त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. कधी कधी तर विश्रांती न घेता ते सलग ४८ तास काम करतात. यामुळे त्यांच्या त्रासात भर पडत असून लागण झाल्यानंतर मृत्यू होत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे,” असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयेश लेले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.


bottom of page