top of page
Writer's pictureMahannewsonline

३५० रुपयांची लाच... ;२४ वर्षांनी पोलीस उपनिरीक्षकाची निर्दोष सुटका

मुंबई : १९८८ मध्ये ३५० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एक वर्षांची शिक्षा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची चोवीस वर्षांनंतर उच्च न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली. या अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे किंवा त्याच्याकडून वसूल करण्यात आलेली रक्कम लाचेचीच आहे, हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले आहे, असे न्यायालयाने म्हटले.


दामू आव्हाड हे १९८८ मध्ये नाशिक येथील येवला पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यकत होते. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना ३५० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर १९९८ मध्ये नाशिक येथील विशेष न्यायालयाने आव्हाड यांना ३५० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवून त्यांना एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याचवर्षी आव्हाड यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर तब्बल चोवीस वर्षे आव्हाड यांचा संघर्ष सुरू होता. न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या एकल खंडपीठाने आव्हाड यांच्या अपिलावर निर्णय देताना त्यांना दिलासा दिला.

bottom of page