top of page
Writer's pictureMahannewsonline

VIDEO : भरधाव कारने नागरिकांना चिरडले, एकाचा मृत्यू तर ९ जखमी; CCTV फुटेज आले समोर

जयपूर: एका भरधाव कारने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जोधपूर येथे मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एम्स रोडवर हा अपघात झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे की, एक भारधाव ऑडी कार रस्त्यावरील नागरिकांना चिरडते तसेच अनेक दुचाकी वाहनचालकांनाही जोरदार धडक देते. कारने धडक दिल्यावर अनेक दुचाकी आणि माणसे अक्षरशः उडताना दिसत आहेत. यानंतर शेजारील झोपड्यांमध्ये ही गाडी शिरते. या अपघातानंतर तात्काळ स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

ज्या भरधाव कारने नागरिकांना चिरडले ती गाडी राजस्थानमधील जयपूर येथील रजिस्ट्रेशनची असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचा सीसीटीव्ही पाहून अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. या अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियातही जोरदार व्हायरल होत आहे.



bottom of page