top of page
Writer's pictureMahannewsonline

रिक्षा चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉर्च्युनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ६ जखमी

Updated: Dec 13, 2021

नवी मुंबईतील पामबीच मार्गावर आज (रविवारी) भीषण अपघात झाला. रिक्षा चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेली फॉर्च्युनर कार डिव्हायडरवर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील सिवूड सिग्नलजवळ संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. बेलापूरकडून सीवूड्सच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाचालकाने रेड सिग्नल असतानाही रिक्षा न थांबवता तसाच पुढे निघाला. त्याचवेळी ग्रीन सिग्नल लागल्याचे पाहून फॉर्च्युनर कार वाशीकडून बेलापूरच्या दिशेने येत होती. समोरून रिक्षा येत असल्याचे पाहून फॉर्च्युनर चालकाने रिक्षा चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉर्च्यूनर कार डिव्हायडरला जाऊन धडकली. कारचा वेग जास्त असल्यामुळे फॉर्च्यूनर ३ ते ४ पलटी मारली आणि शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, याच फॉर्च्युनरचा अक्षरश: चुराडा झाला. फॉर्च्युनर कारमध्ये ५ जण प्रवास करत होते. तर रिक्षामध्ये दोघे जण होते. या अपघातात दोन्ही वाहनातील सर्व जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहनं बाजूला केली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहनं बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.



bottom of page