top of page

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी निघाले अन् वाटेत मृत्यूने गाठले; अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू, १५ जखमी


नांदेड : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये सासू आणि जावयाचा जागीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य १५ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी नांदेड- हैदराबाद मार्गावरील कृष्णूरजवळ ही घटना घडली आहे.


देगलूर नाका परिसरात एका नातेवाईकाचे निधन झाल्याने हे सर्व जण चारचाकीने नांदेडच्या दिशेने निघाले होते. मात्र अत्यविधीला पोहोचण्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. नांदेड- हैदराबाद महामार्गावर कुष्णूरजवळ गाडीचा समोरील टायर फुटल्याने जीप उलटली. या अपघातात सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.


शेख महेबूब बाबू शेख (४०) व अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख (५५) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर या अपघातामध्ये पिरसाब नवाबसाब शेख , खाजा मगदूम शेख, फरजना खाजा शेख, खुदबोद्दीन नवाज साब , घाशी साब बाबूसाब शेख, शादुल बाबूसाब शेख, आजमिर महेबूब शेख, खाजा साब मौलासाब शेख, हैदर इस्माईल साब शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य सात जण या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातीमधील सर्व जखमींवर सध्या नादेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



bottom of page