top of page
Writer's pictureMahannewsonline

आई मदतीसाठी हात जोडत होती... लोक व्हिडीओ बनवत राहिले ... अखेर अपघातातील जखमी मुलाचा झाला मृत्यू

अपघातात जखमी झालेल्यांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. पण हल्ली सोशल मीडियाच्या दुनियेत लोक जखमींना मदत करणे सोडून व्हिडीओ/ फोटो काढण्यात गुंग होताना दिसतात. यामुळे उपचाराअभावी काहींचा मृत्यू होतो. अशीच घटना राजस्थानमध्ये घडली आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा बघ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील असाडा येथील महेंद्र कुमार हा त्याची आई कमला हिच्यासोबत दुचाकीवरून जात होता. बिठुआ-बालोतरा मार्गावर त्याच्या दुचाकीची एका अन्य दुचाकीशी समोरा-समोर धडक झाली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. मात्र अपघातानंतर तिथे असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. या अपघातात जखमी झालेल्या आपल्या मुलाला मांडीवर घेऊन एक आई मदतीसाठी विनवणी करत होती. मात्र तिथे असलेले अनेकजण बघ्याची भूमिका घेऊन व्हिडीओ बनवत राहिले. कुणीही मदतीसाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला.


bottom of page