top of page
Writer's pictureMahannewsonline

पुणे-नगर मार्गावर भीषण अपघात; पाच ठार

भरधाव ट्रकने कारसहीत दोन दुचाकींना दिली धडक


भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक तोडून समोरुन येणाऱ्या एका कारला आणि दोन दुचाकी गाड्यांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर पाचजण जखमी झाले आहे. हा अपघात पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर येथे रविवारी सायंकाळी घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शिक्रापूरजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील (एमएच १२ डीजे ९६५७) ताबा सुटल्याने हा अपघात झाला. रस्त्याच्या मधील दुभाजक तोडून ट्रक बाजूच्या मार्गिकेमध्ये घुसला आणि त्याने समोरुन येणाऱ्या कार सह दोन दुचाकी (एमएच १२ आर ४०५० आणि एमएच १२ टीजी ९३५१) गाड्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दांम्पत्याचा मृत्यू झाला. विठ्ठल हिंगाडे, रेश्मा हिंगाडे, लीना नीकसे अशी मृतांपैकी तिघांची नाव असून अन्य दोघांची नावे समजू शकलेली नाहीत.


bottom of page