top of page
Writer's pictureMahannewsonline

रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बसला ट्रकची जोरदार धडक; १८ जणांचा मृत्यू

लखनऊ : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डबल डेकर बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी जाले आहेत. उत्तरप्रदेशातील बाराबंकी येथे लखनऊ-अयोध्या महामार्गावर हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डबल डेकर ही खासगी ट्रॅव्हल्स बस हरियाणातून बिहारकडे जात होती, त्याच दरम्यान रामसनेहीघाट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या कल्याणी नदीच्या पुलावर बसचा एक्सेल तुटल्याने बस बंद पडली होती. बस बंद पडल्याने चालकाने रस्त्याच्या बाजूला बस उभी केली होती. याच दरम्यान मागून आलेल्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर 7 प्रवाशांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.


bottom of page