top of page
Writer's pictureMahannewsonline

भीषण अपघात; एसटीच्या धडकेत तीन तरुण ठार

वैजापूर : भरधाव एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेने तीन तरुण जागीच जागीच ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ एच रस्त्यावरील खंडाळा शिवारातील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजता हा अपघात झाला. सोमनाथ साहेबराव निकम (२८, रा.शिऊर, ता. वैजापूर), कडुबा ज्ञानेश्वर ठुबे (२९), अमोल भाऊसाहेब ठुबे (२५, दोघे राहणार पोखरी, ता.वैजापूर) असे अपघातात जागीच ठार झालेल्या मृतांची नावे आहेत.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिघेही तरुण वैजापूरहून त्यांच्या गावाकडे दुचाकीने (एमएच २० एफ एन ४१७२) परतत हाेते. खंडाळा गाव शिवारातील पालेजा यांच्या पेट्रोल पंपांजवळ आले असताना समोरून येणाऱ्या एसटीने (एम एच १४ बीटी ३३४४) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले. धडक दिल्यानंतर एस टी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एसटी रस्त्याच्या खाली उलटली. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जखमींना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले.


bottom of page