top of page
Writer's pictureMahannewsonline

एसटी-ट्रकचा भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू; 8 जखमी

एसटी बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले. लातूर-अंबाजोगाई रोड वर आज सकाळी हा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-औरंगाबाद ही बस लातूरहुन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा अंबाजोगाई येथून लातूरकडे जात होता. अंबाजोगाईमध्ये वळणावर सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास एसटी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आठ जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मालमोटारीचा समोरील भाग एसटी बस मध्ये घुसल्याने बस एका बाजूने कापली गेली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे.मयत आणि जखमींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, बसचा समोरील भाग पूर्ण चक्काचूर झाला आहे अपघाताचे काही फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओज पाहून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.



bottom of page