top of page
Writer's pictureMahannewsonline

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

ईडीसमोर हजर होण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी ट्वीट करत मांडली बाजू

गेल्या पाच महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या . परंतु त्यांचा कोणताच शोध लागत नव्हता. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला असून आपली बाजू मांडली आहे.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप केल्यानंतर देशमुखांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी दाखल झाले नव्हते. ईडीने अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. परंतू ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. त्यांचं म्हणणं ते वकिलांच्या मार्फत न्यायालयात मांडत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं आज अखेर अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात हजर झाले.


bottom of page