top of page
Writer's pictureMahannewsonline

अनिल देशमुख यांचा राजीनामा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या चौकशीचे आदेश देताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीआय चौकशीदरम्यान गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना सांगितलं. त्याला शरद पवारांनी संमती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्र्याना देण्यासाठी गेले असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.


मुंबई उच्च न्यायालयाने काय दिला निर्णय

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर यांनी केलेल्या याचिकेसह अन्य याचिकांवरील निर्णय बुधवारी राखून ठेवला होता. तो निर्णय आज देण्यात आला. निर्णय देताना न्यायालयाने सांगितलं की, ‘जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत त्यामुळे असामान्य स्थिती म्हणून सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले जात आहेत. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा की नाही याचा निर्णय सीबीआयने घ्यावा’.


bottom of page