top of page
Writer's pictureMahannewsonline

आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले; सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब अचानक कोसळला

मुंबई : शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते. बैठक सुरु असतानाच सह्याद्री अतिथीगृहातील 4 क्रमांकाच्या हॉल बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या दूर्घटनेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले असून कोणीही जखमी झाले नाही. या दूर्घटनेनंतर आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

आदित्य ठाकरे हे आपल्या विभागातील काही महत्त्वाच्या कामांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. काही विषयांवर चर्चा सुरू असताना सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सह्याद्री अतिथीगृहातील हे बांधकाम अंदाजे 20 ते 25 वर्षांपूर्वीचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. बांधकाम विभाग अधिकारी यांची चौकशी केली जात असून या बांधकामाची तातडीने दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

बैठकीसाठी राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना अचानक ही घटना घडला. या दूर्घटनेत कोणालाही इजा झाली नसून बैठक सुरू असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर हा स्लॅब कोसळला, त्यावेळी त्या जागी कोणीही नसल्याने मोठे संकट टळले. या घटनेनंतर सर्वच संबंधितांना तेथून दुसऱ्या सुरक्षित जागी नेण्यात आले.


bottom of page