top of page
Writer's pictureMahannewsonline

शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांना ईडीचं समन्स; चौकशी दरम्यान तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल

Updated: Sep 29, 2021

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स पाठवलं होतं. आज सकाळी ईडीचे अधिकारी चौकशीसाठी त्यांच्या कांदिवलीच्या घरी दाखल झाले होते. मात्र, चौकशी दरम्यान, अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीने गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स बजावले असल्याचे समजते.

“ आनंदराव अडसूळ यांना कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. ही रवि राणा यांनी पेरलले माहिती आहे. रवि राणा यांनी इडीच्या अधिकाऱ्यांना पैशाच्या किंवा राजकीय दबावाखाली ठेवलेलं आहे. पहिल्या वेळी चौकशीसाठी बोलवल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी जवाब नोंदवला होता कारण तक्रारदार ते स्वतः होते. असे अभिजीत अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

दरम्यान, सीटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी फेटाळून लावला आहे. सीटी बँकेत ८०० कोटींची उलाढाल होती. मग, ९८० कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



bottom of page