top of page
Writer's pictureMahannewsonline

कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Updated: Nov 24, 2021

वर्धा : कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येते. या योजनांसाठी शासनाच्यावतीने अनुदान दिले जात असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, मळणीयंत्र, पेरणीयंत्र, रिपर, पॅावरटिलर, औजार बॅंक, प्राथमिक प्रक्रीया संयंत्र, दालमिल, ट्रॅक्टरचलीत विविध औजारे अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. सिंचन सुविधा साधनांमध्ये ठिबक व तुषार सिंचन संच, शेतळ्याचा लाभ दिला जातो.

फलोत्पादनासाठी कांदाचाळ, शेडनेट, पॅालीहाऊस, पॅकहाऊस, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, प्लास्टीक मल्चिंग, संत्रा पुनर्जिवन, संत्रा, पपई, ड्रॅगनफुड, आंबा ईत्यादी फळबाग लागवड, व्हेजीटेबल नर्सरी, क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत फुलशेती, हळद, केळी इत्यादींचा लाभ अनुदानावर दिला जातो.

कृषि निगडीत या बाबींसाठी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.


bottom of page