top of page

नाशिक कृषि महोत्सवाचे 10 फेब्रुवारीला आयोजन

नाशिक : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक व महिला आर्थिक विकास

महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे 10 ते 14

फेब्रुवारी 2024 या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवास प्रवेश

विनामुल्य असून शेतकरी व नागरिक यांनी या कृषि महोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग

नोंदवावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नाशिक राजेंद्र निकम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये

केले आहे.



पाच दिवसीय आयोजित कृषि महोत्सवात दोनशे पेक्षा अधिक स्टॉल्स् असणार आहेत. यात

कृषि विभाग व इतर सलग्न विभागाच्या शासकीय येाजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत

पोहचविण्यासाठी शासकीय दालने, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, सेंद्रिय शेतमाल

विक्री, आधुनिक शेती औजारांचे प्रदर्शन तसेच गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचतगट

यांच्यामार्फत उत्पादित केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिली

जाणार आहेत.महाराष्ट्र ग्रामीण खाद्य संस्कृती दर्शविणारे विक्रीचे स्टॉल्स सुद्धा प्रदर्शनात

सहभागी होणार आहेत.

आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजनही कृषि

महोत्सवात करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि विस्तारक, कृषि क्षेत्रातील नवीन उद्योजक यांनाही

पुरस्काराने या महोत्सवात सन्मानित केले जाणार आहे. असेही प्रकल्प संचालक निकम

यांनी कळविले आहे.

bottom of page