top of page
Writer's pictureMahannewsonline

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला! 45 लाख प्रवाशांची क्रेडिट कार्डसह महत्त्वाची माहिती ‘लीक’

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. एअर इंडियाने शुक्रवारी एक निवदेन जारी करुन यासंदर्भातील माहिती दिली. फेब्रुवारी २०२१च्या शेवटच्या आठवड्यात हा हल्ला करण्यात आला असून, ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रवारी २०२१ या कालावधीतील भारतासह इतर देशातील जवळपास 45 लाख प्रवाशांची माहिती लीक झाली असल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या माहितीत प्रवाशांच्या नावासह जन्म तारीख, संपर्क क्रमांक, पासपोर्टवरील माहिती, क्रेडिट कार्डची माहिती यासह इतर माहिती चोरली गेली आहे.

एअर इंडियाच्या प्रवाशांची माहिती साठवण्यात आलेल्या SITA PSS या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. क्रेडिट कार्डची माहिती लीक झाली असली तरी सीवीवी/सीवीसी नंबर डेटा प्रोसेसचा भाग नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. खबरदारीसाठी ग्राहकांनी आपापल्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलावा, असे आवाहनही एअर इंडियाकडून करण्यात आले आहे.


bottom of page