top of page
Writer's pictureMahannewsonline

IND Vs NZ: ‘मुंबईकर’ एजाज पटेलचा विक्रम; ... अशी कामगिरी करणारा जगातील तिसरा खेळाडू

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने ४७.५ षटकात ११९ धावांत १० बळी घेत विक्रमाची नोंद केली आहे. एका डावात १० बळी घेणारा एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. भारताच्या मोहम्मद सिराजच्या रूपात एजाजने १०वा बळी घेत विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी अनिल कुंबळे आणि इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम केला होता.

इंग्लंडच्या लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रेफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि कुंबळे (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडलीने सर्वाधिक ९ बळी घेतले होते. एजाझने १० बळी घेत हा विक्रमसुद्धा मोडीत काढला. एजाज पटेलनं भारताचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, आर आश्विन आणि उमेश यादवला शून्यावर बाद केलं.

कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. जन्माने मुंबईकर असलेल्या एजाजने मुंबईतील वानखेडे मैदानावर हा विक्रम केला आहे.


bottom of page