top of page
Writer's pictureMahannewsonline

अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट

मुंबई :बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी सहमतीने वेगळे होत असल्याचं म्हटलं आहे. हा आमिरचा दुसरा घटस्फोट आहे.


“गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे.


आमिर खान आणि किरण राव यांचे पत्र 
या सुंदर 15 वर्षांमध्ये आम्हाला एकत्रित आयुष्यभराचे अनुभव, आनंदाने जगता आलं. आमचं नातं केवळ विश्वास, आदर आणि प्रेम यावरच फुलले. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करायचा आहे. आम्ही आता फार काळासाठी पती-पत्नी असं न राहता, माता-पिता आणि कुटुंबाच्या रुपात राहू.

आम्ही काही काळापूर्वीच नियोजनपूर्वक वेगळं होण्याची सुरुवात केली होती. आता त्याला औपचारिक रुप दिल्यानं बरं वाटत आहे. विस्तारित कुटुंबाप्रमाणं आमचं जीवन वेगळं जगणार असलो, तरी महत्वाच्या प्रसंगात एकत्र असू.

आम्ही मुलगा आझादची जबाबदारी आई-वडील म्हणून पार पाडू, त्याचं पालन पोषण दोघेही सहकारी म्हणून करु. आम्ही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये सहकारी म्हणून काम सुरु ठेवणार असून त्याबद्दल आम्ही भावूक आहोत.

आमच्या नात्यातील या निर्णयाला सातत्याने पाठिंबा आणि सहकार्य करणारे आमचे कुटुंबीय आणि मित्र यांनादेखील धन्यवाद देतो. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही सुरक्षितपणे या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो.

आम्हाला आमच्या शुभचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळण्याची आशा आहे. आमच्यासारखं तुम्हीही या घटस्फोटाकडे शेवट नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे, अशा दृष्टीने पाहाल! 
– आमिर खान आणि किरण राव

‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्न केले. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता.

दरम्यान, किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं. या आधी १९८६ सालामध्ये आमिर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयला आणि जुनेद ही दोन मुलं आहेत.


bottom of page