top of page
Writer's pictureMahannewsonline

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील ४४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. गेल्या काही दिवसांत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील ४४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १९ प्राध्यापकांचा समावेश आहे. तर उर्वरित २५ कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यासंबंधी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरु तारिक मन्सूर यांनी आयसीएमआरला पत्र लिहिलं असून कोरोनामुळे हे मृत्यू झाल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. येणाऱ्या काही दिवसांत अजून कोरोना रुग्ण आढळण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

अलिगढ विद्यापीठात जवळपास ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यामधील १६ हजार विद्यार्थी १९ हॉस्टेल्समध्ये राहतात. सुरुवातीला जेव्हा विद्यापीठ बंद होतं, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्येच आश्रय घेतला होता. पण आता वसतिगृहेही रिकामी झाली आहेत.


एखादा जीवघेणा विषाणू अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि आजुबाजूच्या परिसराशी जोडलेल्या सिव्हिल लाईन्स परिसरात संक्रमित होत असल्याच्या शंकेला यामुळे बळ मिळत आहे,” असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. दरम्यान चाचणीचे नमुने तपासासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (सीएसआयआर) पाठवण्यात आले आहेत.

४४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ही खूप मोठी शोकांतिका आहे. अनेक मोठे डॉक्टर, वरिष्ठ प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डीन, चेअरमन यांचाही समावेश होता. निरोगी आणि तंदुरुस्त असणाऱ्या अनेक तरुणांचाही मृत्यू झाल्याची माहिती राज्यशास्त्राच्या प्राध्यापक डॉक्टर आर्शी खान यांनी दिली आहे.


bottom of page