top of page
Writer's pictureMahannewsonline

'अमरावती बंद'ला हिंसक वळण; जमावाने केली घोषणाबाजी अन् तोडफोड

अमरावती: त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या निषेधार्थ भाजपने शहर बंदचं आवाहन केलं होतं. आजच्या या बंदला हिंसक वळण लागलं. मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग असलेल्या जमावाने घोषणाबाजी करत दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीमार करावा लागला.

भाजपने आज अमरावती बंदची हाक दिली होती. दुकानदारांना दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. सकाळपासून शहरात तणावपूर्ण शांतता होती. मात्र, सकाळी १० वाजल्यानंतर अचानक एक जमाव राजकमल चौकात दाखल झाला. हातात काठ्या घेऊन आलेल्या या तरुणांनी संपूर्ण परिसरात जोरदार दगडफेक केली. या जमावाने दुकानांचीही तोडफोड करत जबरदस्तीने दुकाने बंद केली. गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला.

अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं.







bottom of page