top of page
Writer's pictureMahannewsonline

हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाही... इथे वेळेतच हजर राहायचं...

समीर वानखेडेंनी अनन्याला सुनावले

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. काल अनन्याला ११ वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलाविले असता तब्बल तीन तास ती उशिरा पोहोचली. यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी अनन्याला चांगलंच फटकारलं आहे. “तुला ११ वाजता बोलवलं होतं आणि तू आता येतेस,” अशा शब्दात समीर वानखेडेंनी अनन्याला सुनावले.

मुंबई-गोवा क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनन्या पांडेची ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली.

काल २२ ऑक्टोबरला एनसीबीने अनन्याला ११ वाजता एनसीबी ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र ती एनसीबी कार्यालयात दुपारी २ वाजता पोहोचली. तिला त्या ठिकाणी पोहोचण्यात ३ तास उशीर झाला. यानंतर समीर वानखेडे तिच्यावर चांगलेच भडकले. यावेळी ते म्हणाले, “आम्ही तुम्हाला ११ वाजता बोलवलं होते आणि तुम्ही आता येताय. अधिकारी तुमच्यासाठी बसलेले नाहीत. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाही. हे एनसीबीचे मध्यवर्ती कार्यालय आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेत बोलावले जाईल, त्याच वेळेतच हजर राहा,” असे समीर वानखेडेंनी सांगितले.


bottom of page