top of page
Writer's pictureMahannewsonline

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी

बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी 5240 मतांनी झाल्या आहेत. मंगला अंगडी यांना 440327 मते तर काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 435087 मते मिळाली आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 117174 मते मिळाली.

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर झालेल्या बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी निवडणुकीच्या रिंगणात होते. सुरुवातीपासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली होती, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज बेळगावात आली होती.


bottom of page