top of page
Writer's pictureMahannewsonline

अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेतची पत्नी स्नेहाने पती अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या प्रकरणी अनिकेतला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ दिली, असे स्नेहाने म्हटले आहे.

स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


bottom of page