top of page
Writer's pictureMahannewsonline

... अन्यथा बेमुदत उपोषण; अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा

महाविकास आघाडी सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षासह अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केल्याचे दिसले. त्यानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाईनचा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे.

त्याबाबतचं एक पत्र अण्णांनी 3 फेब्रुवारीला राज्य सरकारला पाठवलं आहे.. मात्र या पत्राची दखल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनीही घेतलेली नाही. त्यामुळे हजारे यांनी पुन्हा दोघांना स्मरणपत्र पाठवले आहे.त्यात वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात बेमुदत उपोषण करण्यावर ठाम असल्याचं राज्य सरकारला कळवलं आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी व भावी पिढय़ांसाठी घातक आहे. असंही या पत्रात म्हंटले आहे.


bottom of page