top of page

अभिजीत पाटील यांच्या राज्यातील विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे

उद्योजक अभिजीत पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील इतर साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सकाळी साडेसहापासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरू आहे. गेल्या काही वर्षात अभिजीत पाटील यानी वेगवेगळे कारखाने विकत घेतल्याने कमी वेळामध्ये त्यांची साखर सम्राटामध्ये गणना होऊ लागली होती. आता त्यांच्याच कारखान्यावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने चर्चेला उधान आल्याचे दिसून येत आहे.

अभिजीत पोटील यांनी काही वर्षातच राज्यातील ४ खासगी साखर कारखाने विकत घेतले होते. त्यात सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना (पंढरपूर, सोलापूर), धाराशीव साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद), धाराशीव साखर कारखाना युनिट २ (लोहा, नांदेड), वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, चांदवड, नाशिक या या कारखान्याचा समावेश आहे. तर अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील २० वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपणे चालवून दाखवला आहे.


bottom of page