top of page
Writer's pictureMahannewsonline

…भर कार्यक्रमात दारुडा अजित पवारांच्या पाया पडायला आला अन्

शनिवारी बारामती तालुक्यातील कटफळ येथे ड्रोनद्वारे भूमापन सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला . त्यावेळी अजित पवारांनी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाची पाहणी करत प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. दरम्यान हे प्रात्यक्षिक सुरु असताना एक दारुडा अजित पवारांच्या पाया पडायला आला. यावेळी पोलीस आणि इतरांना त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. अगदी दुपारच्या वेळी मद्यप्राशन केलेलं पाहून अजित पवारांनीही आपल्या शैलीत दुपारीच चंद्रावर, काय चाललंय काय? अशी विचारणा केली. नंतर पोलीस त्या दारुड्याला बाजूला घेऊन गेले.

या घटनेमुळे अजित पवार संतापलेले पहायला मिळाले. त्यांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत. लोक दुपारीच चंद्रावर जायला लागलेत असं सांगत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दारुड्यांमुळे गावात त्रास होत असल्याने दादा दारुधंदे बंद करायला पोलिसांना सांगा, अशी मागणी खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने केली. त्यानंतर याबाबत कारवाईची तातडीने आदेश दिले.


bottom of page