top of page
Writer's pictureMahannewsonline

अजित पवार आणि आदित्य ठाकरेंचा एकाच गाडीतून प्रवास; स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती..

अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी सकाळी अचानक मुंबईतील काही भागांचा दौरा केला. अजित पवार आणि आदित्य ठाकरे पहाटेच घरातून बाहेर पडले. विशेष म्हणजे यावेळी आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. तर अजित पवार त्यांच्या बाजूला बसले होते. अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या या एकत्रित दौऱ्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

आज (शुक्रवारी) सकाळी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी दादर येथील चैत्यभूमी परिसर, वरळी, वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, हिल टॉप लेन आदी परिसरातील विकासकामांची आज पाहणी केली विकासकामांची पाहणी करताना अजित पवार यांनी या भागांमधील झोपडपट्ट्यांची रचना, येथील समस्या आणि एकंदरित परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. तर अजित पवार त्यांच्या बाजूला बसले होते. यावेळी अजित पवार यांनी वरळी, महालक्ष्मी परिसरातील समस्यांबद्दलची माहिती स्थानिक आमदार असणाऱ्या आदित्य ठाकरेंकडून घेतली. या एकत्रित पाहणी दौऱ्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याची चर्चा रंगली आहेे.



bottom of page