बदलापूर प्रकरण: अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि सेक्रेटरी यांना…
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला आज कल्याण कोर्टामध्ये हजर केले. यावेळी कोर्टाने अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणी शाळेच्या मुख्यध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आलं आहे.
बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंला अटक केली होती. अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानतंर आज पुन्हा त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय या प्रकरणातील कलमांमध्ये वाढ केली असून कलम 6 आणि 21 वाढवण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष, आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आले असून ते फरार आहेत.