top of page
Writer's pictureMahannewsonline

अल्पवयीन मुलाचे 'ते' कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...

औरंगाबादः हल्ली वयोवृद्धांपासून लहान मुलांकडे मोबाइल सर्रास दिसून येतो. प्रत्येकजण सतत मोबाइलमध्ये सतत काहींना काही पाहत असतो. ऑनलाईन शिक्षणामुळे लहान मुलांकडेही मोबाइल दिसून येतो. मुलांच्या हातात मोबाइल असल्यावर ते त्यावर काय करतात, काय पाहतात, याची खबरदारी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊन कमी वयातच मुलं कुठल्या थरापर्यंत बिघडू शकतात, याचा प्रत्येय नुकताच औरंगबााद येथील घटनेमुळे आला. औरंगाबाद येथील १५ वर्षाच्या मुलाने ५ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चार वाजता गारखेडा परिसरात ही घटना घडली. येथील एका अपार्टमेंटसमोर पाच वर्षांची लहान मुलगी सायकल खेळत होती. यावेळी याच परिसरातच राहणारा १५ वर्षीय मुलगा तेथून फिरत होता. या चिमुकलीला एकटीला पाहून सायकल खेळण्याच्या बहाण्याने गोड बोलून त्याने मुलीला सायकलवर बसवून शेजारच्या कॉलनीत नेले. तेथे उभ्या असलेल्या दोन वाहनांच्यामध्ये नेत तिच्यासोबत अश्लील चाळे सुरु केले. मात्र समोरून एक महिला येत असल्याचे पाहताच त्याने तिथून पळ काढला. या प्रकाराणे चिमुकली प्रचंड घाबरली होती. कसा-बसा हा प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, १५ वर्षाच्या मुलाने केलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्यामुळे त्या मुलापर्यंत पोहोचायला पोलिसांना फार वेळ लागला नाही. दरम्यान मुलाच्या वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी आधी आरोप टाळत प्रश्नांचा भडिमार सुरु केला. पण पोलिसांनी फुटेज दाखवताच त्यांनाही मोठा धक्का बसला. आणि कपाळाला हात लावला. काही वेळाने ते शांत झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरण, अत्याचार व बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाअंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


bottom of page