top of page

औषधी वनस्पती

हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती या रोगपरिहार, वेदनामुक्ती, सौंदर्यवर्धन आदींसाठी  वापरल्या जातात. आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार, होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी, चिनी, तिबेटी, इ. सर्व औषधी पद्धतीमध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो. सुगंधी द्रव्ये व पाककृती यांतही वनस्पतींचा वापर होतो. भारतात पुरातन काळापासून या वनस्पतींचा उपयोग विविध प्रकारच्या व्याधी व आजारांवरील उपचारासाठी केला जात आहे. औषधी वनस्पतीच्या मुळे, पाने, फुले, साल, फळे, बियांचा वापर उपचारासाठी होतो. अशाच काही वनस्पतींचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. तर चला पाहू यात अशाच काही औषधी वनस्पतींची माहिती...

bottom of page