top of page

आघाडा

श्रावणातल्या मंगळागौरीच्या पुजेसाठी लागणारी आघाड्याची पाने निसर्गाने माणसाला दिलेली देणगीच आहेत. पुजेव्यतिरिक्त, आघाडा ही वनस्पती आपल्या शरिरालाही अनेक आजारांपासून दूर ठेवते. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, आमांश, रक्तरोग, श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारांत उपयुक्त आहे.

Aaghada

हे आहेत फायदे ... 

⬛ आघाड्याची २५ ग्रॅम पाने २ ग्रॅम मिरीसोबत मिक्सर किंवा पाट्यावर वाटून घ्यावीत. त्या वाटणाच्या गोळ्या करून त्या चघळाव्यात. याने दमा कमी होतो, कफ,, खोकल्यासाठीही आघाड्याचे चूर्ण किंवा रस घेतल्यास उपयोगी ठरतो.

⬛ आघाड्याच्या पानांचा काढा मधातून किंवा उसासोबत घेतल्यास जुलाब थांबतात. या वनस्पतीच्या योग्य प्रमाणातील सेवनामुऴे अपचन आणि मुळव्याध यांना आळा बसतो.

⬛ नाकाची आग होत असल्यास किंवा नाकाचे हाड वाढल्यास, सर्दीमुळे नाक चोंदल्यास, आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला एकत्र करून त्याचे चूर्ण तयार करतात. त्यात तिळाचे तेल घालून आटवतात. हे तेल डॉक्टरी सल्ल्याने नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते.

⬛ जखम झाल्यास, त्या जागी आघाड्याच्या पानांचे चूर्ण वा भस्म करूनबांधून ठेवावे.

⬛ आघाड्याच्या मुळांचा रस नियमितपणे घेतल्यास दृष्टीदोष, काचबिंदू हे आजार लवकर बरे होतात.

⬛ पायात काटा विशेषत: बाभळीचा काटा मोडल्यास आघाडयाचा रस चोळून लावावा.

⬛ पोटदुखीवर आघाडयाची ४-५ पानं चावून खावीत किंवा पानांचा रस काढून प्यावा.

⬛ पित्त झाल्यास आघाडयाचं बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून द्यावं म्हणजे पित्त बाहेर पडतं किंवा शमतं. नंतर तूपभात खावा.

⬛ अंगावरील चरबी कमी करण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत.

⬛ आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहेत. विंचवाच्या विषारावर आघाडयाचे तुरे किंवा मुळी पाण्यात उगाळून ते पाण्यात कालवावं. हे पाणी थोडं थोडं प्यायला द्यावं. पाणी कडू लागलं, की विष उतरलं असं समजावं. उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मधाबरोबर देतात. विंचूदंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात व मूळ उगाळून पिण्यास देतात.

* आपल्या डॉक्टरांच्या / वैद्यांचा सल्ला घेतल्याशिवाय वरील औषधी वनस्पतींचा वापर करू नये.  

bottom of page