top of page

शिकेकाई

आयुर्वेदीय ­दृष्टिकोनातून पाहता शिकेकाई निव्वळ केस धुण्यासाठीच नव्हे तर अनेक औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. आयुर्वेदामध्ये शिकेकाईला भरपूर महत्त्व आहे. केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी शिकेकाईचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये योग्य पद्धतीनं याचा समावेश केल्यास तुमचे केस लांबसडक, घनदाट आणि मऊ होतील.

Shikekai

हे आहेत फायदे ... 

⬛ त्वचारोग झालेले असल्यास, विशेषत: फंगल इन्फेक्शन झालेले असल्यास शिकेकाईचा वापर सर्वोत्तम. २ चमचे शिकेकाई पावडर, १ चमचा बावची पावडर, १ चमचा कापूर कचरी पावडर,१ चमचा ज्येष्ठमध पावडर व १ चमचा आवळा पावडर असे मिश्रण करून ठेवावे. आंघोळीच्या वेळेस त्वचारोग झालेल्या भागावर ही पावडर पाण्यात मिसळून चोळून लावावी.

⬛ शिकेकाई केसांसाठी सर्वोत्तम समजली जाते. शिकेकाईच्या वापराने केसांच्या तेलकटपणा जातो. पण केस कोरडे होत नाहीत. शिकेकाई बरोबर सुयोग्य प्रमाणात रिठा वापरल्यास केस अधिक चांगले होतात त्यासाठी शिकेकाई १०० ग्रॅम, रिठा २० ग्रॅम, बडीशोप २० ग्रॅम, ज्येष्ठमध २० ग्रॅम, मेथी २५ ग्रॅम. वरील सगळे घटक पदार्थ एकत्र दळून आणावेत. यातील दोन चमचे मिश्रण अर्धा लिटर पाण्यात उकळावे व या पाण्याने केस धुवावेत. यामुळे केसांचे आयोग्य अनेक पटीनी सुधारते. केस मृदु मुलायम रेशमासारखे चमकदार बनतात.

⬛ शिकेकाई उत्तेजक, कडू, उलट्या होण्यास मदत करणारी आणि शीतल आहे. याचमुळे शिकेकाईचा उपयोग जळजळ होत असल्यास होतो.

⬛ शिकेकाई बद्धकोष्ठ दूर करणारी आहे. बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा शिकेकाई पावडर, अर्धा चमचा बडी शोप पावडर व अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर असे मिश्रण १ ग्लास पाण्याबोबर घेतल्यास फारच फायदा होतो.

⬛ मुतखड्याचा त्रास असल्या एक चमचा शिकेकाई पावडर एक ग्लास पाण्यात उकळावी. पाणी अर्धे आटल्यानंतर गाळून घ्यावे. रोज अर्था कप शिकेकाईचे पाणी आठ दिवस प्यावयास घ्यावे.

⬛ शिकेकाईमध्ये अँटी बॅक्टेरिअलचे गुणधर्म आहेत. हे घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरुम कमी करतात. ही औषधी वनस्पती केसांप्रमाणेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे.एका वाटीमध्ये एक चमचा शिकेकाई पावडर, एक चमचा हळद, मध एकत्र घ्या आणि याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. नियमित या पेस्टनं आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करा. या स्क्रबचा वापर केल्यास तुम्हाला महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरण्याची आवश्यकता भासणार नाही.

⬛ केसांप्रमाणेच त्वचेसाठीही शिकेकाई लाभदायक आहे. खाज सुटणे, त्वचा लाल होणे, कोरडी होणे इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त आहे.

⬛ खरुज सारख्या त्वचा विकारांवर शिकेकाई रामबाण उपाय आहे. गरम पाणी आणि हळद एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. यानंतर शिकेकाईची पावडरही त्यात मिक्स करा. हळद, शिकेकाई नीट एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये दूध मिक्स करा. आता या मिश्रणाचा अँटी सेप्टिक बॉडी वॉशच्या स्वरुपात उपयोग करा. यामुळे खरुजची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

⬛ तुम्ही एकदा शिकेकाईचा वापर करून पाहा. दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा दूध, बदाम पावडर, हळद आणि दोन चमचे मध मिक्स करा. आता हे मिश्रण बॉडी स्क्रब प्रमाणे वापरा. त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होईल. ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येईल.

* आपल्या डॉक्टरांच्या / वैद्यांचा सल्ला घेतल्याशिवाय वरील औषधी वनस्पतींचा वापर करू नये.  

bottom of page