top of page

तामिळनाडू विधानसभेत चेन्नई सुपर किंग्जवर बंदी घालण्याची मागणी

क्रिकेट चाहते सध्या आयपीएल २०२३ चा आनंद लुटत आहेत. मात्र, तामिळनाडूच्या एका आमदाराने चेन्नई सुपर किंग्जवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. धर्मपुरी, तामिळनाडू येथील पीएमके आमदार, एसपी व्यंकटेश्वरन यांनी मंगळवारी विधानसभेत ही मागणी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जकडे कोणतेही स्थानिक खेळाडू नसल्याचा आरोप करत त्याबी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) वर बंदी घालण्याची राज्य सरकारला विनंती केली.


प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी आज विधानसभेत केवळ जनतेच्या भावना सांगितल्या. ते तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व करत असल्याने आमच्या लोकांद्वारे ते नफा कमावत आहेत, पण संघात तामिळनाडूचे एकही खेळाडू नाही. आमच्या राज्यातील आणखी लोकांनी संघाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे.”



bottom of page