top of page
Writer's pictureMahannewsonline

व्यापाऱ्याने घेतला गळफास तर पत्नीनेही कापून घेतला स्वतःचा गळा

एका व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमित बन्सल असं आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ही घटना समजताच त्याच्या पत्नीनेही धारदार शस्त्राने स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून अचानक घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणारे इंटेरियर डेकोरेटर अमित बन्सल याचे घराशेजारीच कार्यालय असून तिथं ते प्लायवूडचा व्यवसायदेखील करायचे.बन्सल हे हाय प्रोफाईल कुटुंबातील असून त्यांचे जावई हे पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी आहेत. नेहमीप्रमाणे कार्यालयात आलेल्या अमित बन्सल यांनी तिथे स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कार्यालयात खळबळ उडाली.


पत्नीचाही आत्महत्येचा प्रयत्न

अमित यांच्यापाठोपाठ काही वेळाने त्यांची पत्नी पिंकी कार्यालयात आली. पतीनं गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच पेपर कटरनं स्वतःची मान कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिंकी यांना कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही घटना समजताच अनेक पोलीस ठाण्यांतील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अमित यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत,


bottom of page