top of page
Writer's pictureMahannewsonline

...सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन हवा

बलराम भार्गव यांनी केलं लॉकडाऊनसंबंधी महत्वाचं विधान

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहीर केला जावा अशी मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र त्यासाठी इच्छुक नाही. केंद्राने लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, केरळ, नवी दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी लॉकडाऊनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ज्या जिह्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे. त्या जिल्ह्यात सहा ते आठ आठवडे लॉकडाउन लावला पाहिजे असं मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे.


bottom of page