top of page
Writer's pictureMahannewsonline

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली. भाजपने कालच (रविवारी ) समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता समाधान आवताडे विरुद्ध भगीरथ भालके अशी लढत होणार असून सर्वांच्या नजरा यालढतीकडे लागल्या आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात आता १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चितबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. अखेर भगीरथ भालके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत आज दुपारी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.


" आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा !" , असं जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


bottom of page