top of page
Writer's pictureMahannewsonline

आधी व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी मगच दुकाने उघडायला परवानगी

बीड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी बीडचं प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. कोरोना चाचणीशिवाय त्यांना दुकाने उघडायला परवानगी मिळणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे यापुढे शहरातील व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आजपासून चार ठिकाणी चाचणी होणार असून दिवसाला 1 हजार 600 चाचण्या करण्यात येणार आहे. जे कुणी नियमांचं पालन करणार नाही त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.



राज्यात दिवसेंदिवस कोरोनाला बरोबर एक वर्ष झाले. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. कारागृहातील कैद्यांशी प्रत्यक्ष भेटीस आता मनाई करण्यात आली असून नातेवाईक, वकील यांना भेटीऐवजी व्हिडिओ कॉल व डेडीकेटेड ई-मेलव्दारे संवाद साधता येणार आहे. यासंबंधी जेल प्रशासनाला तसे आदेश देण्यात आलेले.

bottom of page