top of page

कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; सहा जण जागीच ठार

पाटोदा - मांजरसुबा महामार्गावर बामदळे वस्ती येथे कार व टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. अपघातातील मयत हे सर्वजण पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाची वाडी ( ता. केज, जि. बीड ) येथे जात होते, मांजरसुंभा रस्त्यावरील बामदळे वस्ती येथे आज (१४ ऑगस्ट) पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रामहरी चिंतामणी कुटे हे आपल्या कुटुंबासमवेत नातेवाईकाच्या लग्नासाठी पुण्याहून जीवाचीवाडी ( ता. केज, जि. बीड ) येथे चालले होते. पाटोदा- मांजर सुंभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ त्यांच्या कारचा ( क्र. एम.एच.१२के.एन ९७६१) आणि आयशर टेम्पोचा (क्र. एम.एच.२६ बी.ई.५९४५) भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या अपघातात आयशर टेम्पो व दुभाजकाच्यामध्ये कार घुसल्याने ती काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.


bottom of page