top of page
Writer's pictureMahannewsonline

शेतकऱ्यांचे आज भारत बंद आंदोलन

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार) 'भारत बंद'चे आवाहन केले आहे. या बंदमुळे देशभरात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून 'भारत बंद'चे आवाहन केले आहे.

आंदोलक शेतकऱ्यांकडून दूध तसंच भाज्यांचा पुरवठाही रोखण्यात येईल असं सांगितलं आहे. दरम्यान किसान मोर्चाने शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं असून बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत.


सकाळी सहा वाजता भारत बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. राजधानी दिल्लीतही बंद पाळला जाईल असं त्यांनी जाहीर केलं आहे.


bottom of page