top of page
Writer's pictureMahannewsonline

पुणेकरांनी नावं ठेवण्याच्या बाबतीमध्ये देवांनाही सोडलं नाही!

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पुण्यात संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. वारजे परिसरात वन विभागाच्या ३५ एकर जागेवर हे उद्यान साकारणार आहे. यावेळी पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन करताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. पुणेकरांनी नावं ठेवण्याच्या बाबतीमध्ये देवांनाही सोडलं नाही, असं म्हणत त्यांनी पुण्यातील सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते डुल्या मारुती, जिलब्या मारुती... अशा देवांची नावे सांगितली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणीही धरु शकणार नाही. आता जिथे हा कार्यक्रम होतोय तिथे जुन्या काळी विचित्र अपघात, खून मारामाऱ्या होत असायचे. तसंच या भागात रान डुकरांचा जास्त वावर होता. याभागाला ‘डुक्कर खिंड’ असं म्हटलं जातं. तसंच पुण्यातील अनेक ठिकाणांना अशाच प्रकारची नावं आहेत. खरोखरंच पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. त्यापाठीमागे पुणेकरांची असलेली कल्पना, निश्चित पुणेकरांचा हात कुणी धरु शकणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना गॅरंटीने सांगतो,

तुम्ही म्हणाल कसं काय.. तर आपण अनेक शहरांत जातो, पण आपल्या इथे पुण्यात काय म्हणतात, पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा… नुसता म्हसोबा नाही-सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर… उपाशी विठोबा, डुल्या मारुती, जिलब्या मारुती ….. पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही. जिथे देवांना सोडलं नाही तिथे माणसांची, ठिकाणांची काय कथा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


bottom of page