top of page
Writer's pictureMahannewsonline

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

मुंबई: छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिऍलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले आहेत. बिचुकले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी निवडणुकीच्या रिंगणात अचानक घेतलेल्या उडीमुळं रंगत वाढली आहे. अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघी १५० मतं मिळाली होती. ​मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. '२०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्यानं केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पंढरपूरमधून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.


निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी ते एकटेच आले होते. शंका आल्यानं पोलिसांनी त्यांना अडवले असता मी उमेदवार असल्याचा खुलासा त्यांनी केला. तुम्ही मला कसं आडवू शकता, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 'फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. उद्धवदादा तुम्ही कारवाई करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,' अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली


आतादेखील बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार आहे. विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले.


bottom of page