तब्बल ९३५ कासवांची तस्करी; ८ जणांना अटक
ट्रेनमधून तब्बल ९३५ कासवांची तस्करी करणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात नवगछिया रेल्वे स्टेशनवर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (५ फेब्रुवारी) पूर्व मध्य रेल्वेच्या नवगछिया रेल्वे स्टेशनवर तस्करीची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारावर कामाख्या साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये शोध अभियान चालवण्यात आलं. या दरम्यान एका डब्यात तपासणी करताना ४२ बॅग सापडल्या आहेत. यात तस्करांनी एकूण ९३५ कासव चालवले होते. या प्रकरणी पोलिसांनी ५ महिलांसह ३ युवक अशा एकूण ८ जणांना अटक केली. जप्त कासवांसह आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे.