top of page

Video: बिल गेट्स यांच्या हातात चक्क रिक्षाचं स्टेरिंग

मायक्रोसॉफ्टचे सह- संस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहे, बिल गेट्स यांनी नुकतीच आनंद्र महिंद्रा यांची भेट घेतली. त्यानंतर बिल गेट्स यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बिल गेट्स यांच्या हातात चक्क रिक्षाचं स्टेरिंग दिसत असून त्यांनी रिक्षा चालविण्याचा आनंद घेतला. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

बिल गेट्स यांनी इलेक्ट्रिक रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. बिल गेट्स यांनी त्यांच्या भारत भेटीदरम्यान आनंद महिंद्रा यांचीही भेट घेतली होती. या व्हिडीओमध्ये गेट्स अगदी सहजपणे रिक्षा चालवताना दिसत आहेत. त्यांनी या रिक्षाचे कौतुकही केले.


यावेळी त्यांनी महिंद्रा ट्रेओ इलेक्ट्रिक रिक्षाबाबत आपल मत मांडत म्हटले की, मी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली जी १३१ किमीपर्यंत प्रवास करण्यास सक्षम आहे तसेच ४ लोक बसून प्रवास करु शकतात. महिंद्रासारख्या कंपन्या वाहतूक उद्योगाच्या पाठीमागच्या प्रेरक शक्ती आहेत. गेट्सच्या या व्हिडिओला भारतात खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.


bottom of page