top of page
Writer's pictureMahannewsonline

आश्चर्यच ! … एकाच वेळी महिलेने दिला १० बाळांना जन्म; ‘गिनीज बुक’मध्ये झाली नोंद

मागील महिन्यामध्येच मालीमधील एका महिलेने ९ बाळांना जन्म देत सर्वाधिक बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचा बहुमान मिळवला होता. अवघ्या महिन्याभरात हा विक्रम मोडीत निघाला असून एकाच वेळी १० बाळांना जन्म देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेमधील महिलेची दखल गिनीज बुकनेही घेतलीय. गोसियामी धमारा सिटहोल असं एकाच वेळी दहा बाळांना जन्म देणाऱ्या माहिलेचं नाव आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी एकाच वेळी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याने कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गरोदर असतानाच डॉक्टरांनी या महिलेला सहा बाळं होतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र ७ जून रोजी या महिलेच्या पोटात फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रीया करुन सिझेरियन पद्धतीने बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने दहा बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याने डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत आहे. गोसियामी या एकाच वेळी सर्वाधिक मुलांना जन्म देणारी पहिली महिला ठरली आहे. गोसियामी यांना आधीच दोन लहान मुलं आहेत.


मागील महिन्यात आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील २५ वर्षीय हालीमा सिसीने मोरक्को येथील रुग्णालयामध्ये एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. नऊ बाळांमध्ये पाच मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं होतं.

bottom of page