top of page
Writer's pictureMahannewsonline

“बिर्याणीसाठी पैसे कशाला द्यायचे?” ऑडिओ क्लिप व्हायरल; पुणे पोलीस दलात खळबळ

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली ऑडिओ क्लिपची दखल

पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे.

दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील या ऑडिओ क्लिपची दखल घेतली आहे. “या प्रकरणाची ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,” असं दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.


ऑडिओ क्लिपमधील संभाषण –


महिला अधिकारी: विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती मला

पोलीस कर्मचारी : हो…

महिला अधिकारी: कुठे?

पोलीस कर्मचारी : ते मॅडम…एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी

महिला अधिकारी: बरं..अजून तेवढंच आहे?

पोलीस कर्मचारी : अजून एक मटण थाली म्हणून आहे कोल्हापूरची

महिला अधिकारी: बरं..जास्त चांगली कुठे आहे?

पोलीस कर्मचारी : साजूक तुपातली मॅडम…एसपी बिर्याणीची मॅडम..त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे..

पोलीस कर्मचारी : ऑईली बिलकूल नाही..आणि साजूक तुपातली पण चांगली आहे मॅडम..कलर वगैरे नसतं त्यात..काही नाही

महिला अधिकारी: बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे..जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्याल मॅडमनं सांगितलं म्हणून..मी बोलू पीआयला

पोलीस कर्मचारी-नाही मॅडम करतो मी

महिला अधिकारी: नाही पण..त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण?

पोलीस कर्मचारी :आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो

महिला अधिकारी: मग तुम्ही काय करायचे?

पोलीस कर्मचारी : आपण कॅशच करायचो मॅडम

महिला अधिकारी: पे करून?

पोलीस कर्मचारी : हो मॅडम…पे करूनच

महिला अधिकारी: तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं?

पोलीस कर्मचारी : येस मॅडम..मी सांगतो

महिला अधिकारी: नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते

पोलीस कर्मचारी : नाही मी बोलतो

महिला अधिकारी : त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही..


bottom of page