top of page
Writer's pictureMahannewsonline

भाजपच्या जाहीरनाम्याच्या व्हिडीओत पी. चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धामधूम जोरात सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. भाजपाकडून द्रमुक आणि काँग्रेसला लक्ष्य केलं जात आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तो व्हिडीओ स्वरूपातही तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्येच एक चूक झाल्याचं समोर आलं. काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपाने माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेच्या नृत्याचीच क्लिप प्रचाराच्या व्हिडीओत समाविष्ट केली आहे. त्यामुळे तामिळनाडूत चांगलीच चर्चा रंगली आहे.

हा व्हिडीओ तयार करत असताना तामिळनाडू भाजपाने त्यात काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची सून स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या भरतनाट्यम करतानाच्या व्हिडीओतील काही भाग भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या व्हिडीओत समाविष्ट केला आहे. ही चूक तामिळनाडू काँग्रेसनं निदर्शनास आणून विनापरवानगी क्लिप वापरल्यावरून भाजपाला चांगलंच सुनावल आहे. “सहमती घेणं तुमच्यासाठी एक अवघड गोष्ट आहे, हे आम्ही समजू शकतो. पण, तुम्ही विनापरवानगी स्त्रीनिधी कार्ती चिदंबरम यांचा फोटो वापरू शकत नाही. यातून तुम्ही सिद्ध केलंय की तुमची मोहीम पूर्णपणे असत्य आणि प्रचारांनी भरलेली आहे,” अशी टीका तामिळनाडू काँग्रेसनं केली आहे. या व्हिडीओची तामिळनाडूत चांगलीच चर्चा रंगली असून तामिळनाडू भाजपाला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे.



bottom of page