top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : जिल्ह्यात पूरस्थिती अन् भाजप आमदार नाचण्यात व्यस्त; गौतमी पाटील सोबत धरला ठेका

यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती असताना भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे हे गौतमी पाटीलसोबत नाचत असतानाचा Video समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

Video पहा ...

उमरखेडमध्ये मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती, यावेळी आमदार संदीप धुर्वे गौतमी पाटील सोबत ठेका धरून नाचत मंचावर नाचताना दिसले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.



दरम्यान उमरखेड भागात पूरस्थिती असताना आमदार मात्र नाचण्यात व्यस्त असल्याची टीका विरोधकांनी केली. जिल्ह्यात पूरस्थिती आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. अशा काळात सत्ताधारी भाजप पक्ष गौतमी पाटील हिच्या सोबत ठेका धरून नाचत असल्याने त्याच्या तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहे.



Recent Posts

See All
bottom of page